पुणे दि.15 जून, प्रतिनिधी - कोंढवा खुर्द भग्योदय नगर कोंडाई बिल्डिंग येथे शुक्रवार दि. 14 जुन 2024 रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने मतदार नांव नोंदणी अभियान सुरवात करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन देवदास दत्तात्रय लोणकर यांनी केले आहे.
नागरिकांना विविध शासकीय अनुदान व मनपा अनुदान लाभ यजनांची माहिती व्हावी यासाठी त्यांनी जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. या कार्यक्रम प्रसंगी हडपसर ब्लॉक काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. उर्मिलाताई नितीन आरु यांचा सत्कार करून त्यांच्या शुभहस्ते या अभियानाचे उदघाटन ही करण्यात आले.
तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व पुणे मनपा प्रशासनाचे शहरी गरिब योजणा यांची माहीती व लाभार्थीपत्रक वाटप करण्यात आले.
या प्रसंगी हडपसर विधानसभा OBC विभागाचे अध्यक्ष रमेशदादा राऊत, हडपसर विधानसभा काँग्रेस सोशल मिडियाचे अध्यक्ष चेतन पडवळ, रिबेकाताई कांबळे, कांचनताई बालनायक, विना कदम, जाकीर नदाफ, विमल नंबियार, वसिम शेख, नितीन आरु, प्रेम मोहोड, अशपाक बागवान व इतर मान्यवर व नांव नोंदणीस आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.