कोंढवा खुर्द येथे लहान मुलांना Good Habit & Bad Habit मार्गदर्शन व मोफत आरोग्य किट वाटप करण्यात आले

पुणे दि.27 जून, प्रतिनिधी-

पुण्यातील कोंढवा खुर्द येथे निसार फाउंडेशनच्या वतीने दि 24 जून रोजी निसार फौंडेशन च्या कार्यालयात लहान मुलांना आरोग्य किट वाटप करण्यात आले ज्यामुळे लहान मुलांना निरोगी राहण्याची सवय लागु शकेल.

निसार फौंडेशन च्या वतीने कोंढवा खुर्द भाग्योदय नगर येथे विविध अल्पदरात व्हेकेशनल कोर्सेस शिकविले जातात. मुलांना व महिलांना मार्गदर्शन करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ही संस्था करीत आहे. येथे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यांच्या या सामाजिक कार्याचे पालक वर्गात अभिनंदन केले जात आहे.

यावेळी बोलताना आपण आपल्या या संस्थेमार्फत वेळोवेळी मोफत मार्गदर्शन  सेमिनार घेणार असल्याचे  निसार फाउंडेशनचे अध्यक्ष "श्री हफीज शेख" यांनी सांगितले. तर टीचर शाहिस्ता शेख ह्यांनी लहान मुलांना चांगल्या सवयी व वाईट सवयी (Good Habit & Bad Habit) संदर्भात माहिती दिली.

या कार्यक्रमाचच्या अध्यक्षस्थानी श्री जमील चिनिवार कौन्सेलर हे होते. त्यांनी मुलांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री चाँदभाई बळबट्टी यांनी केले 

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post