पुणे शहरातील रस्त्यावर गुत्तेदारांची मनमानी पुणेकरांची होतेय जीवित हानी

 पुणे दि 13, प्रतिनिधी

पुणे शहरातील कात्रज - कोंढवा रोड येथे सुरू असलेल्या कामातील ठेकेदार व प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे काही दिवसांपूर्वी खड्ड्यातील पाण्यात बुडून एका मुलीचा दुःखद मृत्यू झालेला आहे.

तसेच पीएमपीएमएल बसच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या रस्त्यावर अपघात होवून लोकं मरत आहेत. आणि वारंवार होणाऱ्या अपघातात अपंग होवून अनेक पुणेकर त्रस्त आहेत. रस्ता अपघामुळे कुटुंब कर्त्यांना अपंगत्व आल्याने त्यांच्या कुटुंबियांची उपासमाऱीची वेळ येवून ठेपलेली आहे.

याला कारणीभूत सर्वस्वी जबाबदार प्रशासन असून या अशा बेजबाबदार प्रशासनाचा अंदाधुंद कारभार व तिघाडी सरकारचे ठेकेदार धार्जिणे धोरण यामुळे प्रत्येक नागरिक आज रोज जीव मुठीत घेऊन जगत आहे. किंबहुना मरणच सोबत घेवून अपघातप्रवण रस्त्यावर प्रवास करतोय


याचा तीव्र निषेध करण्यासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी "तिघाडी सरकार जीवघेणे सरकार, तिघाडी सरकार पुणेकरांचे कर्दनकाळ, तिघाडी सरकार किती जीव घेणार" अशा विविध घोषणां देत निषेध आणि रोष व्यक्त केला.

या वेळी संपूर्ण कोंढवा-  कात्रज परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणानी दणाणून गेला होता.


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने