अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार  असल्याचे सोशल मीडियावर प्रसारित झल्याने अनेक समाज स्तरावर तीव्र विरोध उमटला.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सोबत फोन द्वारे चर्चा केली.

मुंबई दि. 26 - शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी तीव्र विरोध दर्शवला असून याबाबत ना.रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोघांमध्ये झालेल्या चर्चेत ना.दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक येणार नसल्याचे ठोस आश्वासन ना.रामदास आठवले यांना दिले आसल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक भेदभावाच्या  अमानुष रूढी परंपरा असलेल्या मनुस्मृती विरुद्ध संगर म्हणून महामानव  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृती चे दहन करून सामाजिक क्रांति केली.

त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेल्या मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्यास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध असल्याचे ना.रामदास आठवलेंनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दूरध्वनी द्वारे सांगितले.त्यावर ना.दीपक केसरकर यांनी मनुस्मृती चे श्लोक अभ्यासक्रमात घेणार नसल्याचे आश्वासन ना. रामदास आठवलेंना दिले.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने