पुण्यात पालिका अभियंत्याच्या ड्रॉवर मध्ये नोटांचे बंडल ही गंभीर बाब ! पुणे महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचे आगर: मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी यांचा आरोप


पुणे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या टेबल ड्रॉवरमध्ये जवळपास तीन लाख जवळपास रुपयांची रक्कम असलेले बंडल सापडले आहे.

आपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उजेडात आणल्यावर संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

पथविभागातील एका अधीक्षक अभियंत्याचे कार्यालयात ही घटना घडली. आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड मधील युवक कार्यकर्ते रविराज काळे हे एका तक्रारी संदर्भात पद विभागामध्ये होते. त्यावेळेस कार्यालयातील कनिष्ठ अभियंताला येथे एका ठेकेदाराने नोटांचे बंडल असलेले बंद पाकीट दिल्याचे काळे यांनी पाहिले.या अभियंत्याने हे पाकीट टेबलाच्या ड्रायव्हर मध्ये ठेवून दिले. हा प्रकार पाहिल्यावर काळे व त्यांच्या सहकाऱ्याने संबंधित अभियंताला विचारणा केली. त्यावर या अभियंताने एका ठेकेदाराने पैसे थोड्या वेळासाठी ते आपल्याकडे ठेवायला दिले असल्याचे सांगत उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र काळे यांनी ड्रॉवर मधून पाकीट काढल्यावर त्यात तीन लाखापर्यंतची रक्कम असल्याचे  आप च्या कार्यकर्त्यांनी सांगूतले.

याचे व्हिडिओ चित्रिकरण व्हायरल झाले आहे. 

महानगरपालिका पथविभागाचे प्रमुख श्री पावस्कर यांनी वरिष्ठांशी बोलतो असे मोघम उत्तर दिल्यामुळे या संदर्भात आता या संदर्भात आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तसेच महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

सदरचे पैसे कोणत्या व्यक्तीकडून आले, त्या व्यक्तीचा ठेकेदाराशी संबंध काय? तसेच या ठेकेदाराकडे कोणकोणती कंत्राटे आहेत? या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे. महानगरपालिका हे आता भ्रष्टाचाराचे आगर झाले असून अर्थिक वर्षाखेरीस अधिकाऱ्यांवर टक्के वारीचा पाऊस पडतो. डबल इंजिन सरकारच्या थेट अधिपत्याखाली असलेले प्रशासनही भ्रष्टाचारीच आहे. महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या हिमनगा चे हे केवळ छोटे टोक आहे अशी प्रतिक्रिया मुकुंद किर्दत यांनी दिली आहे.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने