इंडिया आघाडी होत असल्याने सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी भाजप महा-षडयंत्ररचित आहे: मुकुंद किर्दत्त

 

आम आदमी पार्टी यांची पुण्यात झालेली पत्रकार परिषद
पाहण्यासाठी व्हिडिओ वर टच करा.
पुणे दी.23: प्रतिनिधी :

देशात आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये इंडिया आघाडी यांच्यात जागावाटपाची चर्चा यशस्वी झाल्याची बातमी समोर येताच, भाजपने सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी महा-षडयंत्र आखत आहे.असा आरोप पुण्यातील आम आदमी पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.

बहुतेक राज्यांमध्ये जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही चर्चा यशस्वी होईल की नाही हे स्पष्ट नसताना भाजपमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जागावाटपाची ही बातमी समोर येताच भाजपच्या गोटा मध्ये भूकंप झाला आहे. त्यामुळे भाजपने युती तोडण्यासाठी महा-षडयंत्र आखले आहे असा आरोप पुण्यात आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेवून केला. 

काल पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती सांगताना ते म्हणाले कि,'आप'च्या वरिष्ठ नेत्यांना अनेक लोकांकडून संदेश मिळत आसल्याचे सांगत , 'आप'ने इंडिया फ्रंट / आघाडी सोडली नाही, तर मोदीजी सीबीआयच्या माध्यमातून 'अरविंद केजरीवाल' यांना अटक करतील.अशी माहिती मिळत आहे.

आपल्या सर्वांना माहीत आहे की, गेल्या दोन वर्षांपासून मोदीजींनी तथाकथित दिल्ली दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी आणि सीबीआयला कामाला लावले आहे.

गेल्या दोन वर्षात १००० हून अधिक छापे टाकण्यात आले आहेत, इडी  ने ७ समन्स पाठवले आहेत, सीबीआय  ने अनेक नोटिसा पाठवल्या आसुन केजरीवाल यांची सीबीआय  कडून ९ तास चौकशी करण्यात आली आहे, पण सीबीआय  आणि ईडी दोघांनाही एक पैसा किंवा इतर ठोस पुरावा असे काही सापडले नाही. 

शिवाय आता इंडिया फ्रंट /आघाडीची व आप ची चर्चा पूर्ण होत असताना, मोदीजींना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची भीती वाटत आहे.

त्यामुळे आम्हाला सांगण्यात येत आहे ते असे आहे की लवकरच एक दोन दिवसांत सीबीआय सीआरपीसी च्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस जारी करणार आहे आणि त्यानंतर लवकरच, आणखी एकदोन दिवसांत केजरीवाल यांना अटक करतील.

आम्हाला हे देखील सांगण्यात आले आहे की जर आप ने इंडिया फ्रंट /आघाडीची सोडली तर सीबीआय  नोटीस पाठवणार नाही किंवा अरविन्द केजरीवाल यांना अटक करणार नाही. असा आरोप आप प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केला. 

 'आप' हा मोदीजी किंवा त्यांच्या कोणत्याही यंत्रणाना घाबरणारा पक्ष नाही - मग ती सीबीआय असो  किंवा ईडी. 'आप' देशातील जनतेसाठी लढत राहील त्यासाठी कोणत्याही प्रकारची किमत मोजण्याची आप  च्या नेत्यांची तयारी आहे. आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा भाग राहील असे पक्षाने म्हंटले आहे.

या पत्रकार परिषदेत वेळेस आप प्रवक्ता मुकुंद किर्दत तसेच शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, सतीश यादव , अक्षय शिंदे , अमोल मोरे , निरंजन अडागळे, किरण कद्रे , अमोल काळे इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.




Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने