शिक्षण हक्क कायद्यातील बदल मागे घेण्याच्या मागणीसाठी पुण्यात आम आदमी पार्टीचे आंदोलन

पुणे दी.19 प्रतिनिधी :
शिक्षण हक्क कायद्यातील बदल मागे घेण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टी, विविध पालक संघटना यांच्या वतीने रविवार दी.18 फेब्रुवारी रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. 
राज्य शासनाने शिक्षणात कायद्यात सुधारणा करून 'खाजगी शाळांच्या परिसरात जर सरकारी अथवा अनुदानित शाळा असल्यास त्यांनी 25 टक्के राखीव मोफत प्रवेश करण्याची गरज नाही' असा आदेश काढला आहे.
या आदेशाला विरोध दर्शवीत आम आदमी पार्टी तसेच विविध पालक संघटना आणि पालक यांनी रविवार दी.18 फेब्रुवारी रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये तीव्र निदर्शने केली. 

या नव्या बदलामुळे गरीब मुलांना कुठल्याही खाजगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे दुरावली आहे. या बदलामुळे वंचित आणि दुर्बल घटतातील मुले यांच्यासाठी सरकारी शाळा आणि श्रीमंतांसाठी खाजगी इंग्रजी शाळा अशी विभागणी होणार असून या पद्धतीमुळे शिक्षणातील सामाजिकीकरणाच्या उद्देशाला हरताळ फासला जाईल असा आरोप करण्यात आला.
आर्थिक, सामजिक स्तरामुळे येणाऱ्या अडचणी दूर करत खाजगी शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकासाठी 25% राखीव जागा ठेवणे हेच न्यायपूर्ण आहे. त्यामुळे सरकारने केलेली दुरुस्ती ही न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी आहे असा आरोप आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.सरकारने हा बदल करणारा आदेश मागे घ्यावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन पालक करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
 या आंदोलनात आप राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पालक आघाडी अध्यक्ष ललिता गायकवाड, सुरेखा भोसले, आरती करंजावणे, अमोल काळे,  संतोष काळे, अविनाश केंदळे, श्रीकांत भिसे, चंद्रकांत गायकवाड, शिवाजी डोलारे, आसिफ मोमीन, सुनील सौदी, विकास गोलांडे, गिरीश नाईक, विकास चव्हाण, महेंद्र जाधव, संदीप सूर्यवंशी, प्रीतम कोंढाळकर, गोपी जोशी, विकास लोंढे, बिपिन अहिवळे, साहिल परदेशी, उमेश बोदले, अभिजीत वाघमारे, संदीप खरात, शिवराम ठोंबरे, उमेश बागडे, गुणाजी मोरे, राहुल तिवारी, रिजवान शेख, किरण कद्रे, अर्जुन साकोरे, अभिजीत मोरे, विक्रम गायकवाड, सोमनाथ गोडांबे, प्रदीप माने, शंकर थोरात, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील भोसले, उमेश दीक्षित, कुमार धोंगडे, हिना अन्सारी, समीना शेख, मनोज शेट्टी, किरण कांबळे, शमीम बागवान, मुमताज शेख, श्रद्धा शेट्टी, रेधान बागवान, अमित मस्के, मयूर कांबळे, निलेश वांजळे, संजय कटारनवरे, एम अली सईद, संजय रणधीर,अविनाश भाकरे, क्षमा गायकवाड, ॲनी अनिश, शितल कांडेलकर, स्नेहा लावंड, मंजुनाथ मनोरे, अक्षय शिंदे, सतीश यादव, प्रभाकर कोंढाळकर,संदीप धाडगे, ऋषिकेश मारणे, गणेश थरकुडे, मोहसीन अन्सारी इत्यादी पालक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने