आलूर येथे कै. महादेवप्पा संगप्पा व्हट्टे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विद्यार्थ्यांना वही,पेन व खाऊ बिस्कीट वाटप करून पुण्यतिथी साजरी

 

आलूर दि,०३, लकी गुरवे यांजकडून

उमरगा तालुक्यातील आलूर जि.प.प्रा.शाळेत माजी मुख्याध्यापक कै.महादेवप्पा संगप्पा व्हट्टे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे चिरंजीव श्री संगेश व्हट्टे, व सौ.संजिवनी संगेश व्हट्टे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही,पेन व खाऊ  बिस्कीट वाटप करून पुण्यतिथी साजरी केली. 

उमरगा तालुक्यातील आलूर  येथील कै. महादेव संगप्पा व्हट्टे हे आलूर जिल्हा परिषद प्रशाला शाळेत कांही वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. माजी सरपंच मल्लपा संगपा व्हट्टे आणि धाराशिव जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ सुभाष संगप्पा व्हट्टे यांचे बंधू होते.

 कै महादेवप्पा व्हट्टे गावात राजकीय घराण्याशी जोडलेले  असले तरी त्यांनी कधी राजकीय भूमिका स्विकारली नाही. त्यांनी आपले आयुस्य शिक्षण क्षेत्रांशी वाहून घेतले. आपल्या गावच्या शाळेसाठी व गावातील मुलांच्या हितासाठी त्यांनी प्रयत्न केले. चांगली सुसंस्कृत मुलं घडवणे आणि शाळा परिसरात वृक्ष संगोपन करणे हे त्यांचे आवडते छंद होते.

त्यांनी अनेक गोरगरीब मुलांना  शिक्षणासाठी मदत केली.  मुलांच्या खेळाची , रात्री अभ्यासाची शाळेत सोय देखील  करून मुलांना प्रोत्साहन करण्याचे प्रयत्न त्यांनी त्यांच्या हयातीत केले. त्यांच्या प्रयत्नाने अनेक तरुण आज उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचार सरणी ही त्यांची खरी ओळख होती.

त्यांच्या विचाराची शिकवण स्वीकारुन सामाजिक कार्यात सहभागी असणारे त्यांचे चिरंजीव संगेश आणि पोलीस दलात कार्यरत असलेल्या संजीवनी संगेश व्हट्टे यांनी शाळेतील मुलांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करुन त्यांची पुण्यतिथी साजरा केली.

याप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री पाटील सरांनी व्हट्टे  दांपत्याच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. शालेय समिती अध्यक्ष शटप्पा धतुर्गे यांनी शाळेच्या वतीने श्री संगेश व्हट्टे यांचा सत्कार केला. तर सौ.संजिवनी व्हट्टे यांचा सत्कार शाळेच्या शिक्षिका श्रीमती शर्मिला आष्टगी यांनी केला. 

याप्रसंगी शाळा व्यवस्सापन समितीचे उपाध्यक्ष श्री अनिल मरबे,सदस्य सर्वश्री नागेश गुंडगे,श्री हणमंत बिराजदार,श्री शिवानंद लाटे,श्री महादेव तळीकर,श्री संजय कासार,श्री संजय सावरगे,श्री महेश इरकल व श्री गणेश मिरजे,शाळेतिल शिक्षक उपस्थित होते.


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने