अयोध्येत प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्त कोंढवा परिसरात आनंदोत्सव साजरा

पुणे दि, 22 :-  अयोध्येत मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्र मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळा निमित्य देशभर उत्साह आणि आंनद संचारल्याचे पहायला मिळाले.

अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जुळून आलेल्या या अनमोल सोनेरी क्षणांचा सोहळा देशवाशीयांनी मोठया उत्साहात साजरा केला. या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात भक्तांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात अक्षरशः दिवाळी साजरा केली. 

आनंदाने भक्तांनी डोक्यावर भगव्या टोप्या आणि अंगावर नविन वस्त्र परिधान केले होते. तर घरावर भगवा ध्वज अंगणात भगव्या पताका आणि  सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करून अक्षरशः दिवाळी साजरा केली.

पुण्यात अनेक ठिकाणी LED वर लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले. तरूणाई जेच्या ठेक्यावर मनसोक्त आनंद लुटला.

कोंढवा बु. येथे १०० fit भगवा ध्वज फडकविण्यात आला व महाआरती करण्यात आली. साईनगरच्या साळवे गार्डन समोरील कासट कॉलनीच्या अनेक घरासमोर रांगोळ्या काडून घरावर भगव्या पताका लावून परिसर सजवण्यात आले होते. आणि गणेश मंदिर चौकात मंडप उभारून भव्य फोटो फ्लेक्स उभारण्यात आले होते. त्यात हरिनाम भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला  होता. यावेळी फटाक्यांची आतषबाजी  करण्यात आली.आणि शेवटी दीपप्रज्वलन आणि महाआरती करून आनंद साजरा करण्यात आला. 


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने