या पवित्र क्षणाच्या निमित्ताने मरुम शहरात ही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जाणार आहे.
सोमवार दि 22 जानेवारी रोजी विविध सामाजिक, धार्मिक आकार्यक्रम होत आहेत. विशेषतः दीपोत्सव आणि श्री रामप्रभूंच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक निघणार आहे. यात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दि २२ सोमवार सायंकाळी ठीक 7 वा. हनुमान चौक येथे भव्य दिपोत्सव, रांगोळी, महाआरती, महाप्रसाद व फटाक्याची अतिषबाजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती हनुमान युवक गणेश मंडळ, मुरूम दिली.
दि. 22 जानेवारी रोजी सोनार गल्ली येथील श्रीराम मंदिरात प्रभातकाळी श्रीरामाच्या मूर्तीस महाअभिषेक व पूजा अर्चा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी 8 वाजता शहरातील श्रीराम चौक अयोध्या नगर व कन्या प्रशाला येथून श्रीराम प्रतिमेचे रथयात्रा मोठ्या उत्साहात निघणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी चौक, बसवेश्वर चौक, अशोक चौक,टिळक चौक, किसान चौक,सुभाष चौक गांधी चौक त्यानंतर हनुमान चौक ह्या मार्गावर रथयात्रा काढण्यात येनार आहे.
हनुमान चौक येथील मारुती मंदिरात हजारोंच्या संख्येने पूजन व महाआरती होवुन येथेच रथयात्रेचे समारोप होईल.
त्यानंतर सोनार गल्लीतील श्रीराम मंदिरात श्रीराम कथा प्रवचन कार्यक्रम व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल.