उमरगा तालुक्यातील आलूर येथे मकरसंक्रांतच्या निमित्याने जिल्हा परिषद शाळेत हळदी कुंकु कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

आलूर दि,19 / लकी गुरवे -

उमरगा तालुक्यातील आलूर येथे मकरसंक्रांत सणाच्या निमित्याने जिल्हा परिषद शाळेत महिलांसाठी हळदी कुंकु व तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या वर्षातीच्या पहिल्या संक्रांत सणाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महिलांनी एकमेकांना हळदी कुंकु लावून, मानसन्मान दिला. आणि तीळगुळ घ्या गोड बोला असा संक्रात सणाचा संदेश देत आंनदाने सण साजरा केला.

या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सौ, सीमा बळे या होत्या. 

शाळेच्या अष्टगी मॅडम यांनी संक्रांत सण, हळदी कुंकु आणि तीळ गुळ यांचा सामाजिक संदर्भ  आणि महत्व आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 


 आता लवकरच आपल्या सेवेत दाखल 

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post