काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष साहिल भाऊ केदारी यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात प्रचंड गर्दी करत नागरीकांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ

मनोगत व्यक्त करताना आयोजक साहिल भाऊ केदारी

पुणे/वानवडी दि.१८,: माजी गृह राज्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष साहिल भाऊ शिवाजीराव केदारी यांनी वानवडी, केदारी नगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास नागरिकांची प्रचंड गर्दी करत आरोग्य उपचार सेवेचा लाभ घेतला.

यावेळी माजी गृह राज्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश दादा बागवे यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले. शिबिरात आलेल्या रुग्णांना मोफत तपासणी करून प्राथमिक औषध व डोळ्यासाठी ड्रॉप देण्यात आले. त्याच प्रमाणे मोतिबिंदू आढळलेल्या रुग्णांची तपासनी अंती साहिलभाऊ केदारी याच्या वतीने मोफत शस्त्रक्रियासाठी पुढील उपरासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले. 

यावेळी परिसरातील नागरिकांची डोळे, मधुमेह, रक्तदाब, संधिवात आशा विविध आजारांची तपासणी करून  मोफत उपचार व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

परिसर स्वच्छ ठेवण्यात योगदान असणाऱ्या कचरा वेचक महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. 

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने