मुंबई होणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेच्या महामोर्चात कोकणातून हजारो नागरिक सहभागी होणार- उमेश चव्हाण

चिपळूण - सर्वत्र रुग्णांची होत असलेली आर्थिक लूट, डिपॉझिट विना वेळेत न मिळणारे उपचार, पैशासाठी रोखले जाणारे मृतदेह यामुळे दररोज रुग्णांच्या हक्क अधिकाराची होणारी पायमल्लीच्या घटना दररोज महाराष्ट्रात वारंवार घडत  आहेत.
सर्वत्र हौस्पिटल मनमानी सुरू आहे. असेच घडत 4राहिले तर गरिबांनी पैसे नाहीत म्हणून मरायचं का?
त्यामूळे फौजदारी संहीतेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी त्याचप्रमाणे  विद्यार्थ्यांचे प्रश्न, दररोज स्त्रियांवर होणारे बलात्कार, शेतीमालाला हमीभाव, डॉक्टरांचे संरक्षणाचे प्रश्न, वैद्यकीय साहित्य यंत्रसामग्रीवर सबसिडी दिली पाहिजे, धर्मदाय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांना चाप लावला पाहिजे, अशा पद्धतीच्या तेरा प्रमुख मागण्यांसाठी गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी सेंट झेवियर्स कॉलेज पासून रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने मंत्रालयावर पीपीई किट घालून हजारोंच्या संख्येने रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे,

यासंदर्भात  रुग्णहक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी चिपळूण येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता.
यावेळी त्यांनी रुग्ण हक्क परिषद व रुग्ण हक्क अधिकार आणि शासन यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे कोकण प्रदेशाध्यक्ष सुहास पंचाळ, केंद्रीय कार्यालय सचिव गिरीष घाग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, कोकण विभाग सचिव संतोष घाग, उदय पवार, ऍड. अशोक निकम प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष उमेश चव्हाण याांनी यावेळी मार्गदर्शणात वाढती बेरोजगारी, दररोजच्या लहान मुलींपासून ते महिलांवर अन्याय अत्याचाराच्या सामूहिक बलात्काराच्या घटना, ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शिक्षण व फी तगादा. शेती मालाला भाव नाही. प्रक्रिया उद्योगाला आणि सर्वसामान्य नागरिकांना एकच भावाने शेतीमाल विकला जात आहे. 

हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. माणसाच्या आयुष्यातील सुख हिरावून घेऊन दुःख निर्माण करणारे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ सोडविले पाहिजेत, 
म्हणून गांधी जयंतीदिनी हजारो नागरिकांच्या संख्येने पीपीई किट घालून मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या आक्रोश महामोर्चा मध्ये सर्वसामान्य नागरिकांनीही सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post