पिसोळी' येथे स्वखर्चातून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमीपूजन करून कामाला सुरवात झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे


झपाट्याने विकसीत होत असलेल्या पुण्यातील 'पिसोळी' येथे स्वखर्चातून सिमेंट रस्त्याचे काम करण्यात येत असून त्याचे नुकतेच उद्घाटन उद्योगपती व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात.
पिसोळी येथे पावसामुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत होता.
तर वहाण धारकांना वहाण चालवताना कसरत करावी लागायची. त्यातुन वारंवार अपघाताच्या घटना घडायच्या.

या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याने रस्त्याचा प्रश्न मिटणार असून, सिमेंट काँक्रीटचा रस्त्ता झाल्यावर परिसरातील नागरिकांचे दळण वळण सोयीस्कर होणार आहे.
याप्रसंगी पिसोळी येथील प्रश्नांसाठी कायम सहकार्य करू असे आश्वासन नागरिकांना दिले.

यावेळी मा. ग्रामपंचायत सदस्य रामदास मासाळ, तानाजी काळभोर, कपिल काळभोर, मुकुंद मासाळ, महेश औताडे, दिपक शेठ बांदल, दिलीप तारू, बांधकाम व्यावसायिक खंडू वैद्य आणि अनुप नाशिककर, भाऊसाहेब मासाळ, राजेंद्रशेठ येप्रे, अजय कामठे, विजय मुरकुटे, बापू मासाळ, नवनाथ दळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post