महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अनुसुचित जाती महिला विभाग कमिटीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी सौ.रिबेका प्रभानंद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आखील भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत यांच्या नेत्रत्वात अनुसूचित जाती महाराष्ट्रचे प्रभारी मनोज बांगडी व अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष श्री अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना देण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात म्हंटले आहे.
यापूर्वी सौ रिबिका कांबळे पुणे अनुसूचित जाती विभाग महिला उपाध्यक्ष या पदावर काम केलेले आहे.
त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा अध्यक्ष पदाची बढती देण्यात आली आहे.