राजेंद्र बनजगोळे
प्रतिनिधी- तुळजापूर- तालुक्यातील गुंजेवाडी येथे महावितरण कर्मचाऱ्यांच्या मनमानीला वैतागून शेतकरी व गावकऱ्यांनी तुळजापूर महावितरण कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करून वीजवितरणाचा भोंगळ कारभार आणला चव्हाट्यावर.
गेल्या कांही दिवसापासून तुळजापूर तालुक्यातील बनजगोळ गावात वितरण कर्मचाऱ्यांची मनमानी होत आहे.असा आरोप गावकऱ्यांनी केला आसून.शेतकऱ्यांचे लाईट बिल थकीत नसताना वीज कनेक्शन कट करणे व यांचे लाईट बिल थकीत आहे त्यांचे वीज कनेक्शन मात्र चालू ठेवले जात अहेत.शिवाय अनेक वेळा वीज प्रवाह बंद राहत असल्याने मोबाईल रिचार्ज अभावी शालेय मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विजे अभावी पिठाच्या गिरण्या बंद राहतात व पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.
अशा तक्रारी गावकऱ्यांनी तालुका विजवितरण अभियंता यांना प्रतक्ष भेटून व निवेदनाद्वारे केल्या आहेत.
वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीला आवर घालण्याची मागणी कार्यकारी अभियंता गुजर साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी राजकुमार पाटील सावरगाव जिल्हा परिषद सदस्य उस्मानाबाद व कुमार गंजे, विष्णू पाटील, भाऊ पाटील, सुदर्शन जाधव, शिवाजी जाधव .कृष्णा लोकरे, शहाजी पाटील, बंडू पाटील, महेश पाटील, प्रमोद गंजे, निवास गंजे, बंडू तांबे, विकास जाधव, दादा काशीद ,सौदागर काशीद
व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.