रिक्षा चालक इरफान पिरजादे यांचा प्रामाणिक पणा, रिक्षात मिळालेला प्रवाशाचा 60 हजार किमतीचा आयफोन केला परत


कोंढवा- येथील तरुण रिक्षाचालक इरफान मोहम्मद गौस पिरजादे यांनी रिक्षामध्ये विसरलेला 60 हजार रुपये किमतीचा आयफोन मोबाइल प्रवासी इब्राहिम शेख यांना कोंढवा पोलिसांच्या मदतीने परत केल्याने क्राईम ब्रँच शब्बीर सय्यद साहेब यांनी कौतुक व अभिनंदन करून मोबाईल धारकाला केला परत.

सविस्तर माहिती - चालक इरफान पिरजादे यांनी पुण्यातील कॅम्पच्या शिवाजी मार्केट परिसरातून एका प्रवाशांस कात्रज येथे सोडले. नमाजची वेळ झाल्याने रिक्षाचालक कात्रज येथील जवळच्या मशिदी समोर रिक्षा पार्क करून मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेले.
नमाज पडून पुन्हा रिक्षा जवळ येता रिक्षामध्ये त्यांना एक मोबाईल असल्याचे दिसले.आणि कांही वेळातच त्या आयफोन मोबाइल वर फोन आल्याने इरफान पिरजादे यांनी फोन उचलून आपला फोन माझ्या रिक्षामध्ये मला मिळाला आहे व मी सध्या कोंढवा येथील शितल पेट्रोल पंप येथे आहे व आपण तो येऊन घेऊन जावा असे सांगितले.प्रवासी इब्राहिम शेख यांना दिलासा मिळाला.

सदर रिक्षाचालकाने घडलेली घटना येथिल महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल यांच्या कानावर घातली.

प्रवासी इब्राहिम शेख, शफिक भाई पटेल रिक्षा चालक यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथे जावून कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री शब्बीर सय्यद यांना याबाबत सविस्तर माहिती दिली.
आयफोन मोबाईल हा इब्राहिम शेख यांचाच असल्याची खात्री झाल्यानंतर आयफोन मोबाईल इब्राहिम शेख यांना परत दिला.

यावेळी गुन्हे पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद यांनी रिक्षा चालक इरफान मोहम्मद गौस पिरजादे यांची कौतुकाने पाठ थोपटली व प्रवासी इब्राहिम शेख यांनी सुद्धा महागडा मोबाईल फोन परत मिळाल्याने महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष शफिक पटेल व रिक्षा चालक इरफान पिरजादे यांचे आभार मानले.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post