कोंढवा खुर्द परिसरात मोकाट कुऱ्यांचा वावर,अनेक नागरिकांना चावल्याने भीतीचे वातावरण

कोंढवा खुर्द मधिल अनेक भागात मोकाट कुत्र्याचा वावर वाढला असून ते अनेक नागरिकांना चावल्याने त्यांची दहशत पसरली आहे.त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते झाकीर नदाफ यांनी केली आहे. 
शिवनेरी नगर,मिठा नगर व भाग्योदय नगर या परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे विषेशतः सकाळी मार्निग वाँकसाठी जाणारे जेष्ठ नागरिक यांना ते भुंकतात व अंगावर धावून नागरिकांचा पाठलाग करतात व प्रसंगी चावतात. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कांही नागरिकांना चावल्याने कुत्रांची दहशत निर्माण झाली आहे.
कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारे रेबीज इंजेक्शन उपलब्ध नसल्याबे व तुटवडा असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.
तरी मनपा प्रशासनाने यासडे लक्ष देऊन त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समाज सेवक जाकीर नदाफ व या भागातील रहिवाशानी केली आहे.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने