कोंढव्यात मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेची पथक दाखल शोध मोहीम




कोंढवा खुर्द मधिल अनेक भागात मोकाट कुत्र्याचा वावर वाढला असून ते अनेक नागरिकांना चावल्याने त्यांची दहशत पसरली आहे.
त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते झाकीर नदाफ यांनी केली आहे.
शिवनेरी नगर,मिठा नगर व भाग्योदय नगर या परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे विषेशतः सकाळी मार्निग वाँकसाठी जाणारे जेष्ठ नागरिक यांना ते भुंकतात व अंगावर धावून नागरिकांचा पाठलाग करतात व प्रसंगी चावतात. चार पाच लोकांना कुत्यांनी चावा घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असे वृत्त महाराष्ट्र नवक्रांती पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली होते.मनपाच्या त्या संबंधित पथकांनी कोंढवा परिसरात त्यांचा बंदोबस्त केला असून वृत्त प्रकाशित केल्याने व वेळेत मनपा च्या संबंधीत विभागाने याची दाखल घेतल्याने नागरिकांतून आभार व्यक्त केले आहे.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post