कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर मराठी चित्रपट वर्तुळात संतापाची लाट निर्माण झाली असून मराठी निर्माते आणि कला दिग्दर्शक संघटनेच्या सदस्यांनी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. व मराठी चित्रपट इंडस्ट्रीला लागलेली ही कीड समूळ नष्ट करण्याचा विनंती केली.
यासंदर्भात उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. दिलीप सावंत आणि उपायुक्त श्री. स्वामी यांची भेट मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्ष सौ. शालिनी ठाकरे यांनी भेट घेऊन आरोपींना अटक व कार्यवाही करण्यासंदर्भात निवेदन दिले.
त्यावेळी राजेंद्र सापते यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या युनियनच्या चारही फरार आरोपींसोबतच युनियनच्या कमिटी मेंबर्सना लवकरात लवकर जेरबंद करु. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या युनियन ऑफिसला टाळे ठोकू असं आश्वासन उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. दिलीप सावंत आणि उपायुक्त श्री. स्वामी यांनी मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्ष सौ. शालिनी ठाकरे यांना दिले आहे.असल्याचे त्यांनी सांगितले.