कोंढवा- पुण्यातील कोंढवा पोलीस ठाणे च्या हदीतुन मोटार सायकल चोरी होत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी पोलीस स्टेशन कडे येत असल्याने वरिष्ठा कडुन चोराचा शोध लावण्याचा आदेश असल्याने कोंढवा पोलीस कडुन तपास सुरू असता अंमलदार गणेश विधकर यांना बोपदेव घाटात गारवा हॉटेलच्या जवळ, एक इसम संशयीत रित्या विना नंबर प्लेट मोटार सायकाल सह उभा असून तो एक मोटर सायकल कोणास तरी विक्री करण्यासाठी वाई भागातून आल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सरदार पाटील, पो.नि गुन्हे शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे तपास पथक अमलदार पो. हवा. कुंभार, पो.शि.निसाळ, पो.शि.राठोड, पो.ना, धिवार यांनी गारवा हॉटेलच्या परिसरात जागुन शोध घेत असता.
त्यांना मिळालेल्या माहितीच्या वर्णनाप्रमाणे संशयीत इसम हा गारवा हॉटेलच्या जवळ गाडीसह उभा असल्याचे दिसले.
तेव्हा त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने ज्ञानेश्वर विजय जाधव, वय २३ वर्ष, मु.पो. उत्तरे, ता. वाई जि. सातारा असे सांगितले.
त्याच्याकडे असणान्या मोटार सायकलची चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देयु लागला, तेव्हा त्यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन तपास केला असता त्यांनी सदर मोटार सायकल ही कामठे पाटील नगर कोंढवा पुणे या ठिकाणावरुन चोरी केली असल्याची कबुली दिली.
त्यावेळी त्याच्याकडील मोटार सायकल चासीस नं.MBLRAICHTEIH574334 इंजिन नं.HAIDEREIH52650 वरुन माहिती घेतली असता ती नोटार सायकल कोंढवा पो स्टे पुणे गुरनं. ११७५/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. असे दिसून आले.
सदर आरोपीस दाखल गुन्मयानव्य दि. १२।०७।२०२१ रोजी १५०० वा. अटक करुन अधिक विचारपुस केली असता त्याने लोणंद पो स्टेशन, खंडाळा पो स्टे जि. सातारा हदीगधुन ही मोटार सायवाल चोरी केल्याचे कबुल केले.
त्याचेकडुन ०२ स्प्लेंडर व ०१ रॉयल एन फिल्ड असे ०३ मोटार सायकल एकुण १७०,000- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. नामदेव चव्हाण साो. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग, मा. नन्नता पाटील मॅडम परिमंडळ-५ पुणे शहर, मा. राजेंद्र गलांडे सो, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर,
यांचे मार्गदर्शनाखाली व मा. सरदार पाटील सो, दरिष्ठपोलीस निरीक्षक कोदवा पो.ठाणे, मा. शब्बीर सय्यद पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे देखरेखीमध्ये करण्यात आला.
या तपास कामगिरीत पोलीस उप-निरीक्षक प्रभाकर कापुरे तपास पथक अंमलदार पो.हया. कुंभार, पो.ना. विवार, पो.ना. पांडुळे, पो.शि.मिसाळ, पो.शि.राठोड, पोशि रत्नपारखीयांचे पथकाने केली आहे.