शिवनेरी नगर भागातील रावडी बिल्डिंग मध्ये राहणारा संजय रोहिदास घुले याने बेकायदेशीरपणे तलवार व कोयते अशी हत्यारे गोळा करून ठेवले आहेत. अशी माहिती पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे व सुशील धीवार यांना त्याचे बातमीदारा मार्फत मिळाली होती.
त्यानुसार कोंढवा पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सरदार पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री शब्बीर सय्यद यांच्या सूचनेप्रमाणे रावडी बिल्डिंग मध्ये राहत असलेला संजय रोहिदास फुले वय 34 राहणार रावडी बिल्डिंग गेट नंबर 1 रावडी कंपनीच्या मागे शिवनेरी नगर गल्ली नंबर 31 कोंढवा खुर्द पुणे या त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या घरातील लाकडी पेटीतून दोन लोखंडी तलवार दोन कोयते एक सुरा अशी हत्यारे मिळाली.
सदर हत्यार जवळ बाळगण्याचे कारण विचारले असता परिसरात दहशत पसरविण्यासाठी जवळ बाळगली असल्याचे त्यांनी सांगितले.
तेव्हा सदर विरुद्ध पोलीस ठाणे येथे 576 / 2021 भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25), सह महाराष्ट्र पोलीस अँक्ट कलम 37( 1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कापूर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री.नामदेव चव्हाण सो, अप्पर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर ,मा.नम्रता पाटील मॅडम सो,पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5, मा.श्री.राजेंद्र गलांडे सो, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे, मा.श्री.सरदार पाटील सो.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे,श्री.शब्बीर सय्यद सो.पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे ,पो.उप. नि. प्रभाकर कापुरे, पो.हवा. योगेश कुंभार, पो.ना.पृथ्वीराज पांडुळे, सुशील धिवार, पो.अंमलदार मोहन मिसाळ,अभिजीत रत्नपारखी, महेश राठोड यांच्या पथकाने केली आहे.