पुणे- .बहु मताच्या आधारावर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रसरकरचा देशातील नागरिकांवर महागाईचा भडिमार सुरुच असून सर्व सामन्य नागरिक महागाईने भरडला जात आहे.
केंद्रातील सरकारचा महागाईचा सैरावैर सैराट रथ
केंद्रसरकरचा महागाईचा सैरावैर सैराट रथाचा वेग कमी व्हावा यांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे अनेक आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार दि.१२ जुले रोजी हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोढवा खुर्द व वडगाव शेरी येथे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवुन जनजागृती आणि मोदीं सरकर विषयी दोन शब्द प्रतिक्रिया नोंदवून घेण्यात आल्या.
यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष उस्मान तम्बोली, शहर सचिव सभापति दुबे, शहर सचिव दुर्गेश सिंह राजपुरोहित, विधानसभा सरचिटणीस देवीदास लोणकर, अल्पसंख्यक काँग्रेस सरचिटणीस मेहबूब अन्सारी, कोढवा खुर्द प्रभाग अध्यक्ष नूरूल्लाह शेख, अल्पसंख्यक काँग्रेस सचिव अक्षय शेलार, वसीम शेख, ओबैद खान आदी उपस्थित होते.
वडगाव शेरी येथे मोदी सरकार विषयी दोन शब्द अभिप्राय प्रतिक्रिया
वडगांवशेरी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने येरवडा येथील पेट्रोल पंपावर वाढत्या पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवुन नागरिकांकडून मोदी सरकार विषयी दोन शब्द अभिप्राय प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.
यावेळी पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मा. विशाल मलके, पुणे शहर युवक काँग्रेस सहप्रभारी उमेश निंबाळकर, शहर उपाध्यक्ष समीर शेख, बाबा नायडू, अनिल अहिर, विनय माळी, सुनील काळोखे, नागेश भालेराव, अमर मंडलिक, विवेक कडू, स्नेहा शेंडे, अस्लम इंडिकर, जिलानी शेख, मनान सय्यद, ऋतिक गायकवाड, स्वप्नील घोरपडे, गणेश तुपधर व युवक कार्यकर्ते उपस्थीत होते.