कोंढवा बुद्रुक येथे तरूणांनी केली वटपौर्णिमा निमित्त,वड, पिंपळची झाडे लावुन, पूजा करून वटपौर्णिमा साजरी


कोंढवा- गजानन भोसले-
कोंढवा बुद्रुक येथे तरूणांनी वटपौर्णिमा निमित्त,वड आणि पिंपळची झाडे लावुन त्याची पूजा करून केली वटपौर्णिमा साजरी
बहुतांश नेत्यांना खुश करण्यसाठी झाडे लावण्याचाउपक्रम राबवला जातो. फोटो सेशन झाले की झाले.
त्यानंतर ते लावलेले झाड वाढत आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्याला पाणी घालण्यास कोणाकडे वेळच नसतो.
केवळ नेत्यांची वाहवा आणि त्यासाठी चे फोटोशेषण सारखे उपक्रम हे केवळ उपक्रमच राहतात.
त्यामूळे त्या ठिकाणी, त्या जागेवर त्याच खड्यात वेळोवळी वृक्ष रोपण चाललेले असते.
येथील फ्रेंड सर्कलच्या तरुणांनी कोणाला खुश करण्यासाठी नव्हे तर वटपौर्णिमा च्या शुभ दिवशी वड, पिंपळ अशी झाडे वृक्षारोपण करून त्याची पूजा करुन निसर्ग जपा, वृक्ष वाढवा हा संदेश
दिलेला आहे.
वटपौर्णिमा निमित्य आर के कॉलनी, वनविभाग जंगल आशा ठिकाणी आज वट पौर्णिमा निमित्त गजानन भोसले व त्यांच्या मित्र फ्रेंड सर्कल च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
या संकल्पनेसाठी श्री,सवेंदु सोनवणे, श्री,गजानन भोसले, श्री,नितीन चोरडिया, श्री,राहुल छाजेड, श्री,अमित कोटेचा आदी उपस्थित होते
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने