कोंढवा: गेल्या अनेक महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव व ऑक्सिजन ची कमतरता लक्षात घेता वृक्षारोपना सारखे उपक्रम राबवणे गरजेचे आहे झालेले आहे.
त्या अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन व स्व. खा. विठ्ठलरावजी तुपे पाटील यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधुन
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम कात्रज कोंढवा बायपास जवळ गोकुलनगरच्या डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी वन उद्यानात सम्पन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष बाळा कवडे यांनी केले होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून वृक्षारोपना बरोबर वृक्षसंवर्धन सुध्दा करावे असे आव्हान केले.
यावेळी पुणे शहर सरचिटणीस श्री संदिप नाना बधे,पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील शेलार, प्रभाग अध्यक्ष भानुदास टिळेकर, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदयसिंह मुळीक, सामाजिक कार्यकर्ते अजय कांबळे, अंकुश चांदिवडे, ज्ञानेश्वर वाघमोडे, गौरव कोतवाल, शिवाजी डिग्रे, विशाल शिंदे, सुनील मोहिते, धनाजी फुंदे, निलेश डिगोळे, सरपंच अंकुश धिंडले, किशोर मोरे, चंद्रकांत भोसले, राजेंद्र गाडवे, अरुण कांबळे,विलास खर्जे,मधुकर माने, सूर्योदय अकॅडमी संतोष चोरमले व अकॅडमी चे सर्व क्रिडा पट्टू प्रभाग क्र. 41 चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व चे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, आणि मोरया मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.