मा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढवा खुर्द पुणे येथे लहान मुला- मुलींना अल्पोहार वाटप.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व हडपसर ब्लाँक काँग्रेस कमिटी यांच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मा.अध्यक्ष मा.राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे येथे लहान मुला- मुलींना अल्पोहार वाटप करण्यात आले.
शिवनेरी नगर क्र, 30 च्या हरिओम सोसायटी परिसरातील गरीब मूला मुलींना याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास मा. शिलार रतनगिरी अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, उपाध्यक्ष योगेश बोर्डे, सरचिटणीस विशाल वाघेला, ऍड. अक्षय रतनगिरी, बाळासाहेब कांबळे, युवा नेते वैभव डांगमाळी, देविदास गायकवाड, समाजसेवक दिलीप भोसले, दिपक सरोदे, बिमल,पत्रकार मल्लीनाथ गुरवे, ग्लाँडस डायस व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन: सौ. रिबेका कांबळे उपाध्यक्षा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व हडपसर ब्लाँक काँग्रेस कमिटीचे सरचिटनीस मा.देवदास द.लोणकर यांनी केले होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items