पुणे शहरातील कोरोनाची परीस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या महानगरपालिकेतील प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आज आंदोलन केले.
पुण्यात कोरोनाची भयानक परिस्थिती असताना पुणे मनपा प्रशासन राजकारण करत आहे. नागरिकांमध्ये दुजाभाव केला जात आहे.कोरोनाची परिस्थिती संदर्भात उपाययोजना करण्यात पालिका कमी पडत आहे.त्यामुळे पुणेकरांची गैरसोय होत आहे.
मनपा प्रशासनाने त्यांच्या कार्यात सुधारणा नाहीं केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येईल आणि याची पुर्ण जबाबदारी महानगरपालिकेची राहील असे युवक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे यांनी दिला आहे.
पुणे शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाही, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, अपुरा लस पुरवठा या गोष्टींवर लक्ष वेधण्यासाठी तसेच मोदी सरकारने लस वाटपात केलेल्या भेदभाव व महाराष्ट्राला जाणीवपूर्वक कमी केलेला लस पुरवठा याविरोधात आज पुणे महानगरपालिके समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
त्यानंतर महापालिका आयुक्त मा. विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मा.महापौर दत्ताभाऊ धनकवडे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, अभिषेक बोके, मनपा वृक्ष प्राधिकरण सदस्य मनोज पाचपुते, युवक पदाधिकारी रुपेश संत, अविनाश भांड, हर्षद बोडके, निशिकांत कांबळे व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.