कोंढवा खुर्द प्रभाग क्र.२७, मधील ओटा मार्केट" अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे अस्लम बागवान यांनी सांगितले.
ज्यांच्या कडे परवाना आहे अशा पथारी, हाथगाडी, हाँकर्स यांना ६x६ चे गाळे हस्तांतरित करण्यात येणार आहेत
येथील इन्क्रीडीबल समाज सेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांच्याकडे "कुठलेहि पद नाही. केवळ समाज सेवा म्हणून त्यांनी इन्क्रीडीबल समाज सेवक गृप स्थापना करून विविध सामाजिक कार्यात कार्यरत आहेत.
नागरीकांना संविधानाने मिळवून दिलेल्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून ते प्रयत्नशील असतात.
बर्याच वर्षापासून राजकिय हेतुने रखडलेले "ओटा मार्केट " प्रश्न असो की, कचरा समाश्या किंवा हज हाऊस आजवर करण्यात आलेले राजकारण.
कोंढवा येथे हज हऊस नव्हे संस्कृतीक कम्युनिटी हॉल उभारला जात आहे. त्यामुळे त्यांनी हज हाऊसचे राजकारण जनतेसमोर आणले.
विकासाच्या योजना प्रत्यक्षात न राबवता जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप करून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत.
लोकप्रतिनिधी यांनी मतांचे राजकारण न करता नागरी सुविधा यावर लक्ष केंद्रित केले तर दर वर्षी उपलब्ध होणार्या निधीतुन याहि पेक्षा उत्कृष्ट दर्जाची कामे या प्रभागात होऊ शकतात.असे त्यांनी यावेळीं सांगितले.