कोंढवा साठी वेळोवळी पुणे मनपाचा निधी मिळत गेला.परंतु प्रत्यक्षात कामे कांही झाली नाहीत.
असा अरोप करीत माहितीच्या आधिकारानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील इन्क्रीडीबल समाज ग्रुप, जनआंदोलन राष्ट्रीय समनवय, सवराज्य इंडीया, आणि राष्ट्र सेवादल यांच्या वतीने दि.१४ मार्च रोजी कोंढवा कोणार्क मॉल समोर जबाब दो? बेमुदत सत्याग्रह सुरू केले होते.
विविध विभागांना त्याची माहितीचे निवेदन देण्यात आले होते. परंतु कोविडच्या अनुषंगाने प्रशासनाने बेमुदत स्त्याग्रहाला परवानगी नाकारल्याने एक दिवस स्त्याग्रह करून ते गुंडाळले.
उपस्थित करण्यात आलेले कांही मुद्दे-
प्रभाग क्र.२७ मध्ये नागरी मुलभुत सोयी-सुविधा समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहेत.
कांही कामात ठेकेदार,संबधित प्रशासन अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधी यांनी भ्रष्टाचार करुन निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत.
काम अपुर्ण असताना त्यांचे बीलं काढण्यात आले आहेत.
प्रभाग २७ च्या लोकप्रतिनिधीनी निवडणूक काळात हज हाउस च्या नावे मते घेऊन निवडून आले.
भागात हज हाऊसची कार्यलयीन मान्यता नसताना ते बांधले जात आहे.असे (केलेंडर प्रकाशित) करून जनतेची व प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे.
त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी इन्क्रीडाबल ग्रुप अस्लम इसाक बागवान आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
अमेनिटी स्पेस वर होत असलेले बांधकाम हे हज हाऊसचे आहे की,ते कम्युनिटी हाँल आहे याचा खुलासा जनतेला प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी करावा अन्यथा भविष्यात यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभाग २७ मध्ये बांधून तयार असलेली पाण्याची टाकी व नियोजित ओटा मार्केट तात्काळ वापरात आणावा.
प्रभागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामामुळे पाणी, डेनेज, लाईट, वाहातुक यावर प्रचंड तान येत आहे.त्यामुळे विना परवाना बांधकाम रोखावित.
नवीन ट्रान्फर व नियोजित डिपी रस्ते तयार करून त्याचे रुंदीकरण करण्यात यावेत.
रस्तयावरिल हाथगाडी हाँकर पथारीवाले यांना हक्काची जागा देण्यात यावी.
लोकप्रतिनिधींनी शहराचे विद्रुपी करन करणारे विना परवाना प्रसिद्धी लावलेल्या फलकांवर कारवाई करावी.
स्त्री-पुरुषासाठी स्वच्छता व प्रत्येक ५०० फुटावर कचराकुंडी किंवा घंटागाडीची सोया करावी.
आशा विविध मागण्यांची अधिकारी व लोकप्रतिनिधींनी जनतेचे सेवक या नात्याने जबाब द्यावे म्हणून बेमुदत सत्याग्रह करण्यात येत होते.