पुणे दि.२४ मार्च-
पुणे मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे कोंढव्यातील कचरा प्रश्न गंभीर झालेला आहे.या संदर्भात सांगून ही यावर काम केले जात नाही.जाणीवपूर्वक दुजाभाव केला जातो.
असा आरोप मनसेच्या वतीने केला जात असून प्रभाग क्र.२७ चे मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या नेत्रत्वात मनसेच्या वतीने थेट क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकून आज आंदोलन करण्यात आले.
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी भागातील कचरा भरलेले पोते थेट वानवडी क्षेत्रीय कार्यालतात टाकून मनपाचा निषेध केला.
यावेळी प्रशासनाचे करायचं काय ? खाली मुंडकं वर पाय !! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो आशा घोषणा व खळखटाक शैली असलेली आंदोलन शैली, गळ्यात भगवा दुपट्टा, आणि कचरा भरलेले पोते पाहून अधिकाऱ्याची एकच धांदल उडाली.
यावेळी बोलताना मनसेचे कार्यक्षम नगरसेवक साईनाथ बाबर यांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला असून,
ते म्हणाले, "कोंढवा वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकून आम्ही अकार्यक्षम पुणे मनपाचा निषेध करीत आहोत.
या नंतर ही प्रशासन जागे झाले नाही, वेळेवर साफ सफाई करण्यात आली नाही तर थेट कोंढव्यातील कचरा पुण्याच्या कमिशनरच्या घरात टाकु असा ईशारा दिला.