पुणे शहर काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष मा.साहील केदारी यांच्या वाढदिवसा निमित व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन देवदास द.लोणकर यांनी केले होते.
यावेळी कर्तबगार महिलांचा व अपंग दिव्यंग असून ही सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून कांही दिव्यागं अपंग लोकांना व्हिलचेअर देण्यात आले
यावेळी प्रास्ताविक हडपसर ब्लाँक काँग्रेसचे सरचिटनीस मा.देवदास द.लोणकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी अपंग सेलचे अध्यक्ष न्यानेश्र्वर निम्हण, हडपसर ब्लाँक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.प्रो.शोहेब ईनामदार, उपाध्यक्ष मा.रमेश राऊत, हडपसर विधानसभा काँग्रेस अपंग सेलच्या अध्यक्षा मिनाक्षी शिंदे, उपाध्यक्षा संगिता चव्हाण, पुणे शहर महिला काँग्रेसच्या सचिव कांचन बालनायक, हडपसर विधानसभा काँग्रेस अनु.जाती विभाग अध्यक्षा रिबेका कांबळे, हडपसर महिला काँग्रेस उपाध्यक्षा जयश्री राऊत, समाज सेवक दादासाहेब जानराव,विठ्ठल चव्हाण, पत्रकार मल्लिनाथ गुरवे तसेच हडपसर विधानसभा ब्लाँक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुत्रसंचालन सोहेल लांडगे यांनी तर आभार प्रदर्शन मिनाक्षी शिंदे यांनी केले.