पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस चक्क चपलांचा हार घालून केली आरती

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष  वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११-8888983361
पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने वतीने दि.३ मार्च मंगळवारी पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या शासकीय धोरणं कार्यपध्दती वर सडकून टीका करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस चक्क चपलांचा हार घालून उपहासात्मक आरती करून महागाईचा निषेध करताना यावेळी,
"मोदी तुम चाय बेचो। देश नहीं देश नहीं।
मोदी सरकार हाय हाय!! मोदींच करायचं काय ! 
आशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महिला काँग्रेसच्या कमल व्यवहारे, संगीता तिवारी, भारती कोंडे, नीता राजपूत, इंदिरा अहिरे, ताई कसबे, माया दूरे, ज्योती अर्वेन, रजिया बॉलारी, शारदा वीर, मनीषा करपे, सीमा महाडिक, प्रियांका मधाळे, वैशाली रेड्डी, अनुसया गायकवाड, हलीमा शेख, राजश्री अडसूळ, संगीता रुपटक्के, नलिनी दोरगे, पापिता सोनवणे व सौरभ अमराले,कुणाल काळे, हेरॉल्ड मेस्सी उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने