पुण्यात मातीच्या कलशात माती, बीज व पाणी टाकून, मिट्टी बचाव स्त्याग्रहला सुरवात


आज दि.१२ मार्च २०२१ रोजी असहकार आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
व दांडीयात्रा आणि मिठाच्या सत्याग्रहाचे स्मरण करून सत्याग्रहाच्या मार्गाने देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी माती आणि नदी वाचवा सत्याग्रह सुरवात करण्यात आले आहे.
देशातील प्रदूषित होणाऱ्या नदया कडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला न्याय न देता उलट बदनाम करण्याचे मनसुबे सुरू आहेत.
देशाचा पोशिंदा अन्नदाता वाचला तरच देश वाचेल.
त्यामुळे शेती आणि शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द झाले पाहिजेत.
शेती,माती आणि नदीचे पावित्र्य जपले पाहिजे.
अतिक्रमण थांबले पाहिजे असा संदेश आणि उद्देश समोर ठेवून दिल्लीत शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत पुण्यातील महानगर पालिके समोरील नदीपात्रा शपथ घेतली.

हा सत्याग्रह देशभरात १२ मार्च ते ६ एप्रिल २०२१ पर्यंत सूरु राहणार आहे.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे,नदीपात्रातील प्रदूषण व अतिक्रमण थांबवावे यासाठी देशभरात गावागावातुन जागृती अभियान राबवून शेती आणि माती वाचवण्यासाठी म्हणून या सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला आहे असे यावेळी सांगन्यात आले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items