पुणे - रविवार दि.२८ मार्च २०२१ रोजी सांयकाळी ७:४० वाजण्याच्या सुमारास कोंढवा बुद्रुक, साईनगर येथे ४४ वर्षीय महिला पायी जात असतांना मोटार सायकलवरील आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्या महिलेच्या गळयातील अंदाजे दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून पसार झाले.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.