"शिवश्री" एक प्रभावी माध्यम

महाराष्ट्रात आणि इतर राज्यात अनेकांनी बहुजन चळवळीला समोर ठेवून youtub चॅनल आणि पोर्टल ची निंर्मिती केलेली आहे. 
त्याामुळे प्रथाम त्या सर्वाना धन्यवाद देतो. कारण त्यांनी इतरांची पत्रकारितेची केवळ चाकरी न करता स्वतःची पत्रकारिता सुरू केली आहे.

लोकशाही प्रधान देशात प्रसार माध्यमांना महत्वाचे स्थान आसून तेे निपक्ष, निर्भीड आणि विशेषतः कोणाच्या दडपणाखाली नसतात.

आत्याधुनिक नव-नवीन इम्फॉर्मेशन टेक्नॉंलॉजीच्या माध्यमातुन आलेल्या प्रभावी सोशल मीडियाच्या आगमनाने प्रस्थापित प्रसारमाध्यमांची मक्तेदारी आता कमी होताना दिसत आहे.
आनंदाची बाब म्हणजे बहुजन समाजात दर्जेदार सोशल मीडिया सारख हक्कच मध्यम व्यसपीठ तयार होत आहे.

या नेटवर्कचा वापर सर्व समाज हितासाठी चळवळीसाठी आणि बहुजन महापुरुषांच्या समता- स्वातंत्र्य- बंधुत्व विचारांच्या प्रसारासाठी झाला पाहिजे.
एका विचाराने मार्गक्रमण करत असताना एकमेकांच्या साह्यासाठी त्या अनुषणगाने सर्वांचे एक सम्पर्क ग्रुप असायला पाहिजे.असे आम्हाला वाटते.
(संघटना नव्हे.कारण तशा खूप आहेत.)
कारण कोठेही- केव्हाही- आणि कांहीही घडले तरी तात्काळ आणि समान सत्य वृत्तांत व्हॉट्सप वर सर्वाना मिळेल.घटना बातमी तात्काळ सर्वत्र पसरवतात येउ शकतील.त्यामुळे प्रस्थापित प्रसार माध्यमांची वाट पाहण्याची गरज राहणार नाही.

मी स्वतः लोकमत सकाळ पुण्यनगरी गावकरी साठी प्रतिनिधी वार्ताहर म्हणून काम केले आहे. मनात पत्रकारितेचे दर्पण असल्याने त्यापासून अलिप्त  राहवत नाही.

त्यामुळे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ दलित पँथर विचार धारा असलेले समाजपरिवर्तन साठी काम करणारे तमाम कार्यकर्ते डोळ्यासमोर ठेवून भविष्यात एक प्रभावी, सरस ठरेल असा "शिवश्री न्युज" youtub चॅनेल व स्टार महाराष्ट्र नवक्रांती पोर्टल सुरू करीत आहे.
त्यामुळे भविष्यात वेळोवेळी आपल्या सहकार्याची पाठबळाची अपेक्ष्या राहील.

"शिवश्री" हा शब्द मूळ बौद्ध काळातील असला तरी शिवछत्रपती शिवाजी महाराज विचारधारेशी जोडलेला या अर्थाने आसेल.

- धन्यवाद -
मुख्य संपादक
Mallinath Yadav Gurave
M.A.pol-Science
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने