प्रभाग क्रमांक 27 येथे चार नगरसेवक /नगरसेविका यांना वेळोवेळी पुणे मनपाचा निधी मिळत गेला.
परंतु येथील प्रत्यक्षात कामे काही झालीच नाही.असा अरोप करीत येथील इन्क्रीडीबल समाज ग्रुप, जनआंदोलन राष्ट्रीय समनवय, सवराज्य इंडीया, आणि राष्ट्र सेवादल यांच्या वतीने कोंढवा प्रभाग क्रमांक 27 च्या कोणार्क मॉल समोर सत्याग्रह करण्यात आला.
यावेळी माजी आमदार महादेव अण्णा बाबर, नगरसेवक ऍड हाजी गफूर पठाण यांनी भेटी दिल्या.
भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ नुसार "मानवी मूलभूत हक्क व अधिकार" उल्लंघन करत. भ्रष्टाचार करुन सध्याच्या नागरी मुलभुत सोयी सुविधा या समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
कांही कामात ठेकेदार,संबधित प्रशासन अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधी यांनी भ्रष्टाचार करुन निकृष्ट दर्जाचे आणि कांही काम अपुर्ण असताना बीले काडल्याचे आरोप करण्यात आला आहे.
सर्व समस्या उपायोजना होणेकामी संविधानिक हक्काने नागरी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने धरणे आंदोलन सत्याग्रह करण्यात येत असल्याची माहिती अस्लम इसाक बागवान यांनी यावेळी बोलताना दिली.
सत्यगृहींच्या वतीने जगण्याचा अधिकार आणी संविधानातील मुलभुत अधिकार कलम 21 नुसार व मानवी हक्क कलम 3 मधील अन्न, वस्त्र आणि निवारा यानुसार उपस्थित करण्यात आलेले कांही प्रश्न.
1) प्रभाग 27 मध्ये उभारहात असलेली पाण्याच्या टाकीचे लोक आर्पन लोकप्रतिनिधीने कोणतेहि श्रेय न लाटता लोक आर्पण केव्हा होणार.
2) या प्रभागातील नियोजित ओटा मार्केट केव्हा सुरु होणार.
3) तथाकथीत हज हाऊस /कम्युनिटी हाँल केव्हा सुरू होणार तसेच ते हज हाऊस आहे की मल्टिर्पज कम्युनिटि हाँल आहे.
याच्या खुलाश्या सह केव्हा सुरू करण्यात येणार याचे लोकप्रतिनिधी मार्फत लेखी खुलासा देण्यात यावा.
4) शिवनेरी नगर येथील आंबेडकर हाँल, साईबाबा नगर येथील हाँल विना लोकप्रतिनिधी विना नागरीकांना केव्हा व कसा उपलब्ध होणार.
5) या प्रभागातील लायब्ररी, दवाखाना हे केव्हा उपलब्ध होणार.
6) येथील लोकसंख्येत मागील चार वर्षांत पाच पटिने वाढ (त्याचे कारण अन अनधिकृत बांधकामे) या मुळे पाणी, डेनेज, लाईट, वाहातुक यावर प्रचंड तान आलेला असुन येथे टृआन्सफार्मर बसविने, नियोजित डिपी रस्ते तयार करने रस्ता रुंदीकरण करने,रस्तयावरिल हाथगाडी हाँकर पथारीवाले यांना योग्य जागी स्थलांतर करने. रस्तयास पार्किंग पट्टे मारुन देने इत्यादी.
7) शहराचे विद्रुपी करन नियमा अंतर्गत लोकप्रतीधींनी आपल्या प्रसिद्धी साठी लावलेल्या फलकांवर कारवाई करणे.
8) प्रभाग क्रमांक 27 मध्ये स्त्री आणी पुरुषासाठी एकहि स्वच्छता गृह उपलब्ध नाही, त्याची उपलब्धता करून देणे. प्रत्येक 500 फुटावर कचराकुंडी उभारणे आणि घंटागाडीची उपल्बता करून देणे.