Covid-19 च्या जवळपास अकरा महिन्यानंतर कोंढवा येथील गुरुवर्य सदानंद महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू झाले असूूून उपस्थित् विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता वसंतदादा पाटील प्रतिष्ठान च्या वतीने पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.जालीँदर कामठे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
Vivo- कोरोनाच्या महामारीमुळे जवळपास गेली अकरा महिने महाविद्यालय बंद होते.
आता नुकतेच अनेक ठिकाणी ते सुरू होत आहेत.मुलं आनंदाने महाविद्यालयात येत असून आता मनमोकळे पणाने परस्पर संवाद करीत आहेत. वर्षभर थांबलेला मुलांमधील सहवास आणि संवाद आता पुन्हा सुरू झालेला पहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता वसंतदादा पाटील प्रतिष्ठान च्या वतीने पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.जालीँदर कामठे यांच्या शुभहस्ते कोंढवा बु.येथे विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी कोंढवा येथील नामांकित पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन श्री. नरेंद्र मरळ यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मास्क सॅनिटायझर इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे डॉ. विवेकानंद ससाणे प्रा. राजेंद्र डोके प्रा.सोनाली घोलप प्रा.सुवर्णा पैलवान प्रा.कैलास लव्हाळे प्रा.नीलम गोयल प्रा.गोपिका परदेशी प्रा.संदीप इंगळे तसेच सुखदेव लोणकर अमोल वाघ राहुल कामठे इत्यादी उपस्थित होते