पुणे दि.१५ फेब्रुवारी-
पुणे शहर मराठा सेवा संघ व कार्तिकेय सामाजिक संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून तसेच दिव्यांग व विधवा महिलांना साडी वाटप करून शिव जन्मोत्त्सवाची सुरवात करण्यात आली
जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि,१९ फेब्रुवारी रोजी असल्याने मराठा सेवा संघ पुणे अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर यांच्या वतीने शहरात दि.१५ फेब्रु ते २० फेब्रुवारी पर्यंत सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे.
कोंढवा खुर्द येथील भाग्योदय नगर येथे सोमवार दि.१५ फेब्रु पुणे शहर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर यांनी दिव्यांग व विधवा महिलांना साडी वाटप करून शिवजयंती महोत्सवाची सुरवात केली.
कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून झाली.
यावेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर व शिवमती स्वाती महेश टिळे पाटील, महेश टिळे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्र संचालन कार्तिकेय सामाजिक संस्थाचे अध्यक्ष व हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवदास लोणकर यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते जकीर नदाफ,पत्रकार मल्लीनाथ गुरवे, हडपसर काँग्रेसच्या महिला अध्यक्षा मायाताई डुरे,पुणे शहर महिला काँग्रेसच्या सचिव कांचन बालनायक, जिजामाता महिला बचतगट संघटिका ज्योत्स्ना लोणकर, हडपसर अपंग सेल अध्यक्षा मीनाक्षी शिंदे व उपाध्यक्षा संगिता चव्हाण तसेच परिसरातील अनेक महिला उपस्थित होते.