पुणे दि,१६ फेबु- पुणे शहर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर यांनी शहरात अनेक ठिकाणी जन्मोत्सवा निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत.
मराठा सेवा संघ पुणे शहर यांच्या वतीने पुण्यातील अनेक भागात घराघरात भगवा पताका व पुस्तक देऊन शिवजन्मोत्सवचा आज दुसरा दिवस उत्साहात पार पडला.
मंगळवार दि.१६ फेब्रुवारी रोजी पुण्यातील हिंगणे खुर्द शिंहगड रोड व महादेव नगर येथे नागरिकांना भगवा झेंडा (पताका) व कार्य पुस्तक वाटप करण्यात आले.
प्रत्येक घरात प्रत्येकाच्या मनात शिवजयंती रुजली पाहिजे हा संदेश या उपक्रमातुन देण्यात आला.
हिंगणे खुर्द च्या महादेवनगर येथे शिवमती लीलाबाई शेलार, शिवमती सावित्रीबाई भवर, शिवश्री आबा सातपुते यांच्या शुभ हस्ते महिला व नागरिकांना भगवी पताका व कार्य पुस्तक देण्यात आले.
तर हिंगणे खुर्द बसस्टॉप चौकात शिवश्री नितीन शिंदे, शिवश्री दत्ता भाऊ करंजकर, शिवश्री पप्पूसेठ कोंडे यांच्या शुभ हस्ते भगवा पताका व कार्य पुस्तक देऊन घराघरात शिवविचार शिवजयंतीच्या मद्यमातून देण्यात आला.
यावेळी केंदीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर शहर अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर, शिवश्री देवदास लोणकर, मल्लीनाथ गुरवे, लहू अण्णा लिवंगुणे, शिवश्री किशोर भाऊ रायकर, अतुल कार्ले, अवधुत मते, शिवमती वैशालिताई खातपे, सुरेश मते, सागर मारणे,नाना खुणे,गणेश मीटकरी, रफिक पठाण, बाळासाहेब प्रताप, सिद्धार्थ खुणे, महेश खुणे, अमर निवांगुणे इत्यादी कार्यकते उपस्थित होते.