मना-मनात शिवजयंती,घरा-घरात शिवजयंती साजरी झाली पाहिजे-सचिन आडेकर

दि.१६,फेब्रुवारी-
मराठा सेवा संघ पुणे शहरच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२१ अंतर्गत' मना मनात शिव जयंती, घरा घरात शिव जयंती ' या उपक्रमात भगवा पताका (झेंडा) व पुस्तक देऊन शिवजन्मोत्सवाचा दुसरा दिवस हिंगणे खुर्द येथे मंगळवार दि,१६ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.

त्यावेळी मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर यांनी शिवजन्मोत्सव २०२१ च्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना वरील संकल्पना मांडुन सांगितले की,
"मराठा सेवा संघ १९९६ पासून शिवजन्म भूमी शिवनेरी येथे शिव जयंती साजरी करत आहे. प्रथम २००० साली तात्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख साहेब व मंत्री कै. रामकृष्ण मोरे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरी येथे मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणाऱ्या शिव जयंतीला येवून शिव जयंती साजरी केली.
माँसाहेब, जिजाऊ, छत्रपती संभाजीराजे व शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातुन आज पुणे शहरात अनेक ठिकाणी जन्मोत्सवा निमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने भगवा ध्वज व पुस्तक वाटप करुन खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनामनात आणि घराघरात साजरी करण्याचा उपक्रम राबवित आहे".
पुण्यातील हिंगणे सिंहगड रोड व महादेव नगर येथे भगवा झेंडा (पताका) व पुस्तक वाटप प्रत्येक घरात देण्यात आले. शिवश्री आबा जगताप , शिवश्री अजय खुडे शिवश्री नितीन शिंदे, शिवश्री दत्ता भाऊ करंजकर,शिवश्री पप्पूसेठ कोंडे , शिवमती लीलाबाई शेलार,शिवमती सावित्रीबाई भवर,शिवश्री आबा सातपुते यांच्या शुभ हस्ते महिला व नागरिकांना भगवा पताका व पुस्तक देण्यात आले.
सदर कार्यक्रम मराठा सेवा संघाचे केंदीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.

या वेळी शिवश्री देवदास लोणकर, मल्लीनाथ गुरवे, शिवश्री लहू अण्णा लिवंगुणे, शिवश्री किशोर भाऊ रायकर, अतुल कार्ले, अवधुत मते, शिवमती वैशालिताई खातपे, सुरेश मते, सागर मारणे, नाना खुणे, गणेश मीटकरी, रफिक पठाण, बाळासाहेब प्रताप, सिद्धार्थ खुणे, महेश खुणे, अमर निवांगुणे इत्यादी कार्यकते उपस्थित होते,
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items