मराठा सेवा संघ पुणे शहर च्या वतीने शिवजन्मोत्सव २०२१, मना मनात शिवजयंती घरा घरात शिव जयंती' हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत मराठा सेवा संघ शहर अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर व कर्तकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हडपसर विधानसभा काँग्रेस सरचिटणीस देवदास लोणकर यांच्या वतीने शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचा विषय होता-
(१) माँसाहेब जिजाऊ
(२)छत्रपती शिवाजी महाराज
(३) गड-किल्ले
(४) शुद्ध अक्षर लेखन
इत्यादी विषय देण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना कोंढवा खुर्द येथील दुगड विद्यालयात बुधवार दि,१७ रोजी बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष साहिल केदारी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे महापौर,नगरसेवक प्रशांत जगताप, मराठा सेवा संघ केंद्रीय सदस्य,शिवश्री राजेंद्र कुंजीर साहेब आदी मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मराठा सेवा संघाचे केंदीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर, नगरसेवक, माजी महापौर प्रशात जगताप, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष साहिल केदारी यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराज यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून स्पर्धकांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम झाला.
यावेळी मराठा सेवा संघ केंद्रिय सदस्य,शिवश्री राजेंद्र कुंजीर,माजी महापौर प्रशांत जगताप,साहिल केदारी, मुख्यध्यपक भालके सर यांनी विध्यार्थी विध्यार्थीनीना मार्गदर्शन केले.
पालकांनी आपल्या "मुलांना काल्पनिक व दैववादी न बनवता माता जिजाऊ प्रमाणे सत्य व वास्तववादी बनवावे" असे मत मराठा सेवा संघाचे केंद्रिय सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
कोंढवा खुर्द येथे बक्षीस वितरण कार्यक्रम झाला त्यावेळी ते प्रमुख पाहुणे मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे सदस्य जाकिर नदाफ, पत्रकार मल्लिनाथ गुरवे, हडपसर महिला काँग्रेस अध्यक्षा मायाताई डुरे, अनुसुचित जाती हडपसर विधानसभा अध्यक्षा रिबेका कांबळे, पुणे शहर काँग्रेस महिला सचिव सौ.कांचन बालनायक, सेवा दलाच्या विना कदम,ग्लेड्स डायस. उपस्थित होते.