कोल्हापूर महानगरपालिका इमारतीसमोरील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा नूतनीकरणाच्या नावाखाली तीन महिने झाले गोणपाताट बांधून ठेवन्यात आलेला होता.
त्याचे रंगकाम तर सोडाच पण तो खुला करण्याचे काम पालिका करत नाही ही बाब कार्यकर्त्यांच्या लक्ष्यात आल्याने सर्वांनी एकत्र येऊन पालिका अभियंता यांना याची कल्पना देऊन तो खुले करण्याची मागणी केली.
दि.२७ फेब्रुवारी रोजी पालिकेची वाट न पाहता स्वतः वंचित बहुजन आघाडी तर्फे लोक सहभागातून रंगकाम करून घेतले.