महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त कासगी प्रथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या राज्य कार्यकारणीची निवड अहमदनगर येथील सिताराम सारडा शाळेत सम्पन्न झाली.
त्यावेली कोंढवा पुणे येशील श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेतीळ विकास थिटे यांची उपसचिव पदी निवड करण्यात आली आहे.त्यामुळे त्यांचे मित्र परिवारात अभिनंदन होत आहे.
संघटनेच्या नवीन कार्यकारिणी मध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी का.र. तुंगार यांची तर उपसचिव पदी विकास थिटे यांची निवड झाली.
नुतन अध्यक्ष का.र तुंगार उपाध्यक्ष -मारुती पाटील, अशोक मदाने, ज्ञानेश्वर गायकवाड, मुख्यसचिव प्रकाश देशपांडे, उपसचिव विकास थिटे बाळासाहेब वाघमारे, कोषाध्यक्ष सुभाष गांगुर्डे, हिशोब तपासणीस मुसा तांबोळी यांची निवड करून त्यांना पुढील कार्यासाठी सर्वांनी सुभेच्छा दिल्या.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवड कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ऍड.एन.एम हराळे होते.
यावेळी रघुनाथ ठोंबरे, बी.एम.सुर्यवंशी विठ्ठल उरमुडे, नंदकुमार हंबर्डे, विठ्ठल तिवारी, अँड. जयदीप देशपांडे राहुल बोरुडे, शेखर उंडे, पी.बी.पाटील, सदस्य हरिहर चिवडे, नंदकुमार हंबर्डे, गजानन इंगळे, शिवाजी भंडलकर, संतोष आयरे, कृष्णा देशमुख, मधुकर पोळ व राज्यभरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.