मराठा सेवा संघ पुणे शहर, कार्तिकेय सामाजिक संस्था व हडपसर काँग्रेस च्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम हडपसर येथे उत्साहात पार पडला.

मराठा सेवा संघ पुणे शहर, कार्तिकेय सामाजिक संस्था व हडपसर काँग्रेस च्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मराठा सेवा संघ पुणे शहर अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर यांनी शिवजयंती २०२१ अंतर्गत "शिवजयंती मनामनात, शिवजयंती घराघरात हा उपक्रम पुणे शहरात राबवला.

त्या अनुषंगाने हडपसरच्या सय्यद नगर आयडियल शिक्षण संस्थेच्या आलं-जदीद ऊर्दू हायस्कुलमध्ये, "छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवन चारित्रावर" निबंध व शुद्ध लेखन स्पर्धा घेऊन त्याचा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.
 निबंध स्पर्धेत उर्दू माध्यमाच्या 467 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मध्यम गटात फौकीया शेख, अल्फीया शेख, मुस्कान शेख यांनी तर वरिष्ठ गटात इरम अन्सारी, खान सिद्रा, सफा रहीम मोअज्जन यांनी प्रथम तीन क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. फातिमा शेख व साबीर अहमद यांना सुंदरलेखनाचे पारितोषिक मिळाले.

यावेळी मराठा सेवा संघाचे कार्यकारणी सदस्य,शिवश्री राजेंद्र कुंजीर, शहर अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर, शहर कार्याध्यक्ष शिवश्री मारुती सातपुते, कार्तिकेय सामाजिक संस्थाचे देवदास लोणकर, काँग्रेस हडपसर विधानसभा उपाध्यक्ष रमेश दादा राऊत, प्रशांत सुरसे, प्राचार्या भालके सर, प्राचार्य जाकीर शेख, मल्लीनाथ गुरवे, रमेश राऊत आणि संस्थेचे शिक्षक, पदाधिकारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सोहेब इनामदार,सुत्रसंचलन जाकीर शेख, तर आभार प्रदर्शन देवदास लोणकर यांनी मानले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items