पुणे दि.६ फेब्रु -शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी पुण्यातील हडपसर, वारजे माळवाडी आणि मोशी नाशिक रोड या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने आणलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकर्यांचे आंदोलन मागील 73 दिवसांपासून सुरू आहे.
त्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जन आंदोलनची संघर्ष समिती. कामगार कृती समिती, इनक्रेडिबल किसान-मजदुर मंच, इनक्रेडिबल समाजसेवक गृप, इंटक आणि माहायुतीचे घटक पक्ष व इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मिळून आंदोलन केले.
हडपसरच्या सोलापूर रोड वरील वैभव थियेटर समोरील रस्ता, वारजे माळवाडी आणि मोशी (नाशीक रोड) कार्यकर्त्यांनी निदर्शने करून नविन शेतकरी व कामगार कायदयाचा निषेध केले.
नाशिक रोड या ठिकानी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या सह आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी आंदोलनाच्या चारी बाजूने गाड्याच्या रांगा लागल्याने कांही काळ वाहतूक कोंडी झाली.
केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात इनक्रेडिबल चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते, इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला.
तसेच तिन्हि ठिकाणी उपस्थित सहभागी संघटना व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानून "चक्का जाम " ची सांगता करण्यात आली.