पुणे दि.31 जाने-
कोंढ़वा खुर्द गावातील सामाजिक कार्यकर्ते मा.आरूण भोईटे यांची कन्या व गणेश भाऊ भोईटे यांची पुतनी कु.ऋतुजा भोईटे या कन्येस अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी अमेरिका विद्यापीठाची दोन कोटि रूपयांची शिष्यवृत्ती मिळाल्याने तिचे आणि तिच्या परिवाराचे अभिनंदन केले जात आहे.
पुण्याच्या कोंढवा येथील मराठी मनपाची शाळा ते अमेरिकन शिक्षण हा तिचा थक्क करणारा प्रवास हा थक्क करणारा असून, सावित्रीबाई फ़ुले, जय जिजाऊ यांच्या त्यागाचा व विचाराचा पताका परदेशात फडकत असल्याची भावना रिक्षाचालक अरुण भोईटे यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.
ऋतुजा भोईटे चे आठवी पर्यंतचे शिक्षण कोंढ़व्यातील महापालिकेच्या शाळेत झाले आहे.
सर्वसामान्य पालकांचा कल हा सद्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे ज्यास असल्याचे दिसून येत आहे.वेळेत फिस भरण्याची ऐपत असो की,नसो परंतु आपले मूल ईंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकावे असे अनेक कुटुंबाची मानसिकता झालेली आहे.
नर्सरी प्राथमिक व शालेय शिक्षण कसेबसे होते आणि महाविद्यालय मध्ये ऍडमिशन साठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
रिक्षाचालक भोईटे यांनी आपली आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेत ऋतुजला मनपाच्या मराठी शाळेत प्रवेश दिला.मुलगी आणि मुलगा असा दुजाभाव न आणता तिच्या शिक्षणास कांही कमी पडू दिले नाही
ऋतुजने मनपाच्या मराठी शाळेत शिक्षण घेत नियमित अभ्यास आणि पुढे शिकण्याची जिद्द ठेवली. नशीब आणि प्रयत्न तिला अमेरिकेच्या विद्यापीठाची शिस्यवृत्ती मिळऊन दिले.
आता ती अमेरिकेत शिक्षण घेत आहे. तीच्या या निवडीमुळे मराठी भाषेतले शिक्षण कुठेही कमी नाही हे तीनेे दाखवून दिले.
आई नंदा भोईटे भाजी विक्रेता आहे व वडील अरुण भोईटे रिक्शा चालक आहे. असे असले तरी त्यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन देत राहिले. त्यांना त्याचे आज चीज झाल्याचे वाटतेय.
त्यांच्या या अनेरिकेत दोन कोटी रुपये शिस्यवृत्तीची मानकरी आणि अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने तिचे आई वडील,नातेवाईक, शिक्षक, आनंद व्यक्त करीत असून तिचे कौतुक
नगरसेवक श्री.वीरसेन बापू जगताप अध्यक्ष- क्रीडा समिती महानगरपालिका पुणे प्रभाग क्रमांक 41चे नगरसेवकांच्या वतीने व भारतीय जनता युवा मोर्चा हडपसर विधानसभा मतदार संघा च्या वतीने मुलीच्या आई वडिलांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष मा. राघवेंद्र बाप्पू मानकर ,भाजपा हडपसर अध्यक्ष संदीप जी दळवी ,हडपसर युवामोर्चा अध्यक्ष माननीय अमरची गव्हाणे.संघटन सरचिटणीस गणेश भाऊ घुले ,पुणे शहर युवा मोर्चा प्रमोद सातव ,आकाश डांगमाळी ,भाजपा युवा नेते महेंद्र भाऊ गव्हाणे ,दादासाहेब लोणकर ,युवा मोर्चा उपाध्यक्ष अमितजी लोणकर ,बाळासाहेब घुले ,प्रभाग अध्यक्ष प्रतीक जी लोणकर,युवा मोर्चा कोंढ़वा अध्यक्ष ओमकार लोणकर ,सामाजिक कार्यकर्ते मयूर भाऊ काटे ,पै. सागर भाऊ लोणकर,प्रेमराज लोणकर,अमित कोरडे, गणेश हाके आदी उपस्थित होते.