श्री विट्ठलसाई सहकारी साखर कारखाण्याचा २०२०-२०२१चा बॉयलर अग्नी प्रदिपन सभारंभ संपन्न झाला असून गेल्या वर्षाच्या गाळपास ऊस दिलेल्या शेतकरी बांधवांना प्र.मे.टन रु.१००/- चा हप्ता हंगाम शुभारंभ होण्या आधी देण्यात येणार असल्याची माहिती.कारखान्याचे चेअरमन मा.बसवराज पाटील यांनी दिली

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११

उमरगा दि,११ ऑक्टोबर:-
श्री विट्ठलसाई सहकारी साखर कारखाण्याच्या 0 २०२०-२०२१ गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नी प्रदिपन सभारंभ संपन्न झाला.
गेल्या वर्षात कारखान्यास गाळपासाठी ऊस दिलेल्या शेतकरी बांधवांना प्र.मे.टन रु.१००/- चा हप्ता हंगाम शुभारंभ होण्या आधी देण्यात येणार असल्याचे सांगून, कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकरी बांधवांनी आपल्या श्री विट्ठलसाई कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन चेरमन मा.श्री.बसवराजजी पाटील यांनी शेतकरी सभासदांना बॉयलर अग्नी प्रजवलनाच्या कार्यक्रमात केले.
उमरगा तालुक्यातील श्री विट्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि. मुरुम या कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ डिस्टनशिंग नुसार सम्पन्न झाला.

कारखान्याचे चेअरमन व माजी ग्रामविकास राज्यमंत्री मा. श्री. बसवराज माधवराव पाटील साहेब यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याची वाटचाल सुरू आहे.
यावर्षीचा कारखान्याचा हंगाम २०२०-२१ चा बॉयलर अग्नी प्रदिपन सभारंभ आज मा.श्री.बसवराजजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
यावर्षी भागातील ऊसाची उपलब्धता विचारात घेता कारखान्याच्या 5 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्ष्टि निश्चित केले आहे.
कारखान्याच्या ऊस गाळपाच्या हंगामासाठी मशीनरीची कामे, ऊस तोडणी वाहतुकीसाठी लागणारी सर्व यंत्रणा त्यासाठी लागणारे मनुसायबळ, वाहतूक यंत्रणा,भरती करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी गाळपास ऊस दिलेल्या शेतकरी बांधवांना प्र.मे.टन रु.१००/- चा हप्ता हंगाम शुभारंभ होण्याआधी देण्यात येणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकरी बांधवांनी आपल्या श्री विट्ठलसाई कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन मा.श्री.बसवराजजी पाटील यांनी बॉयलर अग्नी प्रजवलनाच्या कार्यक्रमात केले.

याप्रसंगी जिल्हा मध्य.सह.बँकेचे माजी अध्यक्ष मा.श्री.बापुरावजी पाटील साहेब, जि.प.विरोधी पक्षनेते मा.श्री.शरणजी पाटील साहेब कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री.काझीसाहेब, मा.संचालक सर्व श्री. विट्ठलराव पाटील, केशवराव पवार, दिलीपराव पाटील, शरणप्पा पत्रिके, संगमेश्वर घाळे, विट्ठलराव बदोले, राजीव हेबळे, माणिकराव राठोड, दत्तु भालेराव, शिवलिंगप्पा माळी अड. विरसंगप्पा आळंगे, सुभाषचंद्र पाटील, श्रमजीवी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गरुड, आप्पासाहेब हळ्ळे, प्रमोद कुलकर्णी, मल्लिनाथ दंडगे व कार्यकारी संचालक श्री.एम.बी.अथणी आदी मान्यवर व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

सध्या कोरोना (कोवीड-19) विषाणुजन्य आजाराचा प्रादूर्भाव लक्षात घेवुन, सदर कार्यक्रम साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्स मास्क, स्ॉनिटायझर इत्यादीचा अवलंब करुन पार पाडण्यात आला.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने