उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्यक सेल व हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात अली.
कोंढवा खुर्द च्या कोणार्क मॉल येथे रविवार दि.४ ऑक्टोबर रोजी सध्या.६:३० वाजता नागरिकांनी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहिली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.मंत्री रमेशदादा बागवे यांच्या मार्गदर्शनात पुणे शहर अल्पसंख्यक सेलचे सेक्रेटरी मा.नदिम शेख यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे नियोजन हडपसर विधानसभा काँग्रेसचे सरचिटणीस देवदास दत्तात्रेय लोणकर यांनी केले होते.
हडपसर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.माया डुरे,हडपसर महिला अनु.जाती विभाग अध्यक्षा मा.रिबेका कांबळे, हडपसर विधानसभा अपंग सेल उपाध्यक्ष विजय इंगळे, पुणे शहर कोओर्डीनेटर मा.ग्लाँडस डायस व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.