कोंढवा/पुणे दि,११ ऑक्टो-
कोंढवा बुद्रुक परिसर, कात्रज परिसर, येवलेवाडी भागात गेली अनेक महिने पाण्याची समस्या सुरु आहे. अनेक वेळा प्रशासन ला विनंती करून सुद्धा या समस्या मध्ये काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे दि. ५ ऑक्टोबर ला स्वारगेट पाणी पुरवठा कार्यलय मध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर, नगरसेविका रंजनाताई टिळेकर, सौं. वृषाली कामठे,सौं. मनीषा कदम, सौं. राणीताई भोसले, नगरसेवक वीरसेन जगताप, अनिल येवले, तुषार कदम, नितीन मरकड आशा एकूण 35 प्रमुख कार्यकर्त्याना अटक करण्यात आली. या घटनेचा प्रभागात अनेक ठिकाणी निषेधाचे पोषटर्स लावण्यात आले आहेत.
जनतेच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांनी योगेश अण्णा टिळेकर यांच्या घरी जाऊन भेट देऊन त्यांना व त्यांच्या सहकार्यांचे खास अभिनंदन करून चर्चा केली.
यावेळी त्यांच्या बरोबर प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील , शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक त्यांचे प्रमुख पदाधिकारी,मतदार संघातील नागरिक, महाराष्ट्र मधील युवा मोर्चा, OBC मोर्चा चे कार्यकर्ते यांनी भेट दिली.
त्यावर माजी आमदार योगेश टिळेकर यांनी मला लढण्याचे बळ मिळाले. हा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला असून त्यांच्या भेटीने सर्वांचे मनोबल वाढवले आहे.