कोंढवा येथे विविध दुरुस्तीच्या कामाचा राडारोडा रस्त्यावर, व पिण्याच्या पाण्याचा अपवेय.


पुणे:कोंढवा खुर्द मध्ये विविध दुरुस्तीच्या कामावर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने दुरुस्तीच्या कामाचा राडारोडा, रस्त्यावरच पडत असून पिण्याच्या पाण्याचा ही अपवेय होत आहे.

प्रभागात होत असलेले दुरुस्थितीची विविध काम मनपा परवानगीनेच केले जात आहेत का ? याची खात्री करून रात्रीला व सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या कामावर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.

कोंढवा खुर्द मधील गुलजार इन्केविटिक सोसायटी गल्ली न.१ भाग्योदय नगर मधील सत्यानंद हाँस्पिटल समोर सोसायटीची सांडपाणी वाहीनी मनपाच्या मुख्य वाहीनीस जोडण्याचे काम व रस्ता खोदाई करण्यात येत आहे.

त्याशिवाय रस्ते खोदाई, सांडपाणी वाहीनी तसेच नविन नळ कनेक्शन असे अनेक कामे केली जात आहेत. त्या कामाचा राडारोडा त्याच ठिकाणी सोडून जाण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना व दुचाकीवरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

आशा बेफिकीर कामाची प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी करण्यात येत आहे.

यासंदर्भात पाकिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीचा तक्रार क्रमांक WA38616 असा असून चौकशी करून योग्य ती कारवाईची करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी तक्रारदारांना कळवले आहे.

कोंढवा खुर्द भागात कोंढवा पोलिस स्टेशन समोर मुख्य पाण्याची लाईन फुटुन हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार नुकताच घडला.

या संदर्भात कार्तिकेय सामाजिक संस्थेचे सचिव मा.श्री राहुल आप्पा लोणकर यांनी पाणी पुरवठा अधिकारी यांना त्वरीत कल्पना देऊन वाया जाणारे पाणी थांबवण्याची विनंती केली.

पिण्याच्या पाईप लाईन देखभालीची योग्य नियोजन होत नसल्याने असे प्रसंग वारंवार कोंढवा परिसरात घडत आहे.

याकडे पालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे. अशी मागणी कार्तिकेय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा.देवदास लोणकर व सचिव मा.श्री राहुल लोणकर यांनी केली.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items